मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा! १९९५ च्या फसवणूक प्रकरणात शिक्षा कायम!
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. १९९५ च्या फसवणूक प्रकरणात नाशिक न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्यांच्या हकालपट्टीची शिफारस राज्यपालांकडे केली.