Main Ad
Header AD Image
Breaking News

लोकशाही की घराणेशाही? BMC मध्ये ४३ नेत्यांच्या वारसांची ‘एन्ट्री’; निष्ठावान कार्यकर्त्यांचा पत्ता कट, मुंबईत ‘बंडखोरी’चा भडका!

मुंबई महापालिका निवडणुकीत ४३ हून अधिक नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटे मिळाल्याने घराणेशाहीचा वाद पेटला आहे. राहुल नार्वेकर, असलम शेख आणि नवाब मलिकांच्या कुटुंबात प्रत्येकी ३ तिकिटे देण्यात आली आहेत.

कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीचा गुलाल! १० उमेदवार बिनविरोध विजयी; विरोधकांचा ‘सुपडा साफ’, शिंदे-फडणवीसांचे मिशन यशस्वी?

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच महायुतीने १० जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेचे ४ आणि भाजपचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

BMC निवडणूक: छाननीनंतर रणधुमाळीत उडाला गोंधळ! भाजप, काँग्रेस आणि ‘आप’ला मोठा धक्का; दिग्गज उमेदवार निवडणुकीतून बाद

मुंबई महापालिका निवडणुकीच्या छाननीत अनेक मोठ्या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तांत्रिक चुकांमुळे भाजप, काँग्रेस आणि ‘आप’ला काही वॉर्ड्समध्ये उमेदवार उभे करता आले नाहीत.

BMC रणसंग्राम: महायुतीचे १३७-९० समीकरण फिक्स! पण बंडखोरांच्या ‘सुरुंगा’मुळे युतीची धाकधूक वाढली; आज माघारीचा शेवटचा दिवस

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे १३७-९० असे जागावाटप निश्चित झाले आहे. मात्र, बंडखोर उमेदवारांनी आणि अजित पवारांच्या स्वतंत्र भूमिकेने युतीसमोर पेच निर्माण केला आहे.

खळबळजनक! पिंपरी-चिंचवड MIDC मध्ये बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट; बजरंग दलाने पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना बजरंग दलाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. बनावट आधार कार्डांच्या आधारे ते शहरात काम करत होते.

मिशन महापालिका: अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस! बंडखोरांना रोखण्यात महायुती-मविआला यश येणार? ‘बिनविरोध’ची लाट कुणाच्या बाजूने?

महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीने अनेक जागा बिनविरोध काढण्यासाठी कंबर कसली असून बंडखोरांना शांत करण्यात कोणाला यश येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जेफ्री एपस्टीन प्रकरणाचा धमाका! ६८ नवीन फोटो प्रसिद्ध; बिल गेट्स, नोम चॉम्स्की यांच्यासह बड्या हस्तींच्या फोटोंनी खळबळ

अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील ६८ नवीन छायाचित्रे डेमोक्रॅटिक खासदारांनी सार्वजनिक केली आहेत. यामध्ये अनेक प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असून न्याय विभागाच्या डेडलाईनपूर्वीच ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

‘मनरेगा’ इतिहासजमा; लोकसभेत VB-G RAM G बिल मंजूर

‘मनरेगा’ कायदा रद्द करून मोदी सरकारने लोकसभेत VB-G RAM G बिल मंजूर केले. महात्मा गांधींचे नाव हटवल्याने आणि राज्यांवर ४०% खर्चाचा भार टाकल्याने राहुल गांधींनी याला ‘गरिबांचा विश्वासघात’ म्हटले आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा! १९९५ च्या फसवणूक प्रकरणात शिक्षा कायम!

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. १९९५ च्या फसवणूक प्रकरणात नाशिक न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्यांच्या हकालपट्टीची शिफारस राज्यपालांकडे केली.

नॅशनल हेराल्ड प्रकरण: सोनिया आणि राहुल गांधींना मोठा दिलासा!

दिल्लीच्या न्यायालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात ED चा आरोपपत्र तांत्रिक कारणास्तव फेटाळला. न्यायालयाने म्हटले की, मूळ गुन्ह्याचा FIR नोंदविला नाहीतर मनी लाँड्रिंगचा खटला चालविणे अवैध आहे. काँग्रेसने या निर्णयाला राजकीय सूडबुद्धीच्या विरोधात विजय मानला, तर भाजपने क्लीन चिट मिळालेली नसल्याचे सांगितले.