Main Ad
Header AD Image
Breaking News

भारताचा अणू ऊर्जा ‘ब्लास्ट’! लोकसभेत SHANTI बिल मंजूर; २०४७ पर्यंत १०० GW चं लक्ष्य, पण सुरक्षिततेचं काय?

लोकसभेत SHANTI विधेयक मंजूर करून भारताने २०४७ पर्यंत १०० GW अणू ऊर्जेचे लक्ष्य ठेवले आहे. खाजगी कंपन्यांना अणू क्षेत्रात प्रवेश मिळणार असला तरी सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे.

शतकाचा महाशिल्पकार विसावला! ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन

जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे महान शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विनंतीवरून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

उच्च न्यायालयासह ४ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ईमेलमुळे मोठी खळबळ, शोधमोहीम सुरू

मुंबई आणि नागपूरमधील न्यायालयांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने आज मोठी खळबळ उडाली. वांद्रे, अंधेरी आणि उच्च न्यायालयाचा परिसर रिकामा करून पोलिसांनी मोठी शोधमोहीम राबवली.

‘मनरेगा’ इतिहासजमा; लोकसभेत VB-G RAM G बिल मंजूर

‘मनरेगा’ कायदा रद्द करून मोदी सरकारने लोकसभेत VB-G RAM G बिल मंजूर केले. महात्मा गांधींचे नाव हटवल्याने आणि राज्यांवर ४०% खर्चाचा भार टाकल्याने राहुल गांधींनी याला ‘गरिबांचा विश्वासघात’ म्हटले आहे.

भारत-ओमान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी; टेक्सटाईल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात रोजगाराची लाट येणार?

भारत आणि ओमानमध्ये आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. यामुळे भारतीय कापड आणि वाहन उद्योगाला मोठी बाजारपेठ मिळणार असून अब्जावधींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नेटफ्लिक्सने ६ लाख कोटींना खरेदी केलं ‘वॉर्नर ब्रदर्स’; स्ट्रीमिंग युद्धात आता नेटफ्लिक्सच ‘बादशाह’

नेटफ्लिक्सने ७२ अब्ज डॉलर्सला वॉर्नर ब्रदर्स खरेदी करून स्ट्रीमिंग विश्वात खळबळ उडवली आहे. हॅरी पॉटर ते डीसी युनिव्हर्सपर्यंत सर्व आता नेटफ्लिक्सवर दिसणार!

“व्हेनेझुएलाचं तेल आम्हाला परत हवंय!” कच्च्या तेलासाठी जगात युद्धाची ठिणगी पडणार?

“आम्हाला व्हेनेझुएलाचे तेल परत हवे आहे,” या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या वर्चस्वासाठी अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये युद्ध होणार का? पहा सविस्तर विश्लेषण.

स्वारगेट, खडकी अन् हिंजवडीत AQI ३०० पार; पुणेकरांच्या आरोग्याला ‘स्मॉग’चा विळखा

पुण्यात प्रदूषणाचा स्तर धोक्याच्या पातळीवर पोहोचला असून स्वारगेट, खडकी आणि हिंजवडीमध्ये AQI ३०० च्या पार गेला आहे. वाढती धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे पुणेकरांचा श्वास गुदमरत आहे

शेतीप्रधान देशातला शेतकरी किडनी विकतोय! १ लाखाचे कर्ज अन् ७४ लाखांचे व्याज! वाचा सविस्तर!

चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांनी १ लाखाच्या कर्जासाठी ७४ लाखांच्या व्याजाचा छळ सहन करत आपली किडनी कंबोडियात विकली. याप्रकरणी पोलिसांनी ५ अवैध सावकारांना बेड्या ठोकल्या असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा! १९९५ च्या फसवणूक प्रकरणात शिक्षा कायम!

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. १९९५ च्या फसवणूक प्रकरणात नाशिक न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्यांच्या हकालपट्टीची शिफारस राज्यपालांकडे केली.